प्रतिनिधी - वर्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने भारतातील अद्भुत आणी अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेतल जाते! असे प्रतिपादन वर्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोळंकी यांनी पहिल्या महिला शिल्पकार सौ.सुप्रिया शेखर शिंदे यांचा सन्मान करताना काढले. तसेच सोळंकी यांनी सुप्रिया शिंदे यांच्या जागतिक दर्जाच्या शिल्प कार्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली गेली असे जाहीर केले. श्री स्वामी समर्थ यांची 1131 किलोची प्युअर तांब्याची मूर्तीची एक संघ कास्टिंग यापूर्वी कोणीच केले नाही. त्या कामगिरी बद्दल हा बहुमान सौ सुप्रिया शेखर शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पवन सोळंकी यांचे हस्ते तळेगाव पुणे येथे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
या सन्मानाला उत्तर देताना सुप्रिया शिंदे यांनी त्यांचे पती शेखर शिंदे यांच्या साथीमुळेच हे शक्य झाल्याची भावना व्यक्त केली.
भारतातील पहिल्या महिला शिल्पकार सौ सुप्रियाताई शेखर शिंदे, ह्या शिल्पसिद्धी स्टुडिओ आंबेगाव- खुर्द पुणे येथून शिल्पकलेचे कामकाज करतात. सुप्रिया शिंदे यांनी भारती विद्यापीठ मधून पाच वर्षाचा डिप्लोमा इन जी डी आर्ट केला आहे. सुप्रिया शिंदे यांनी युऐई अबुधाबी येथे जागतिक शिल्पकला प्रदर्शनामध्ये भाग घेऊन जगभरात महिला शिल्पकार म्हणून आपला ठसा उमटवला होता. संपूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी सौ सुप्रिया शेखर शिंदे यांना प्रथम महिला शिल्पकार म्हणून गौरवण्यात आलेले आहे.गोवा कला पुरस्कार, अखिल भारतीय कला पुरस्कार,महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन पुरस्कार तसेच दादा कोंडके कला यात्री पुरस्कार बरोबरच तीस पुरस्कार त्यांना आता पर्यंत मिळालेले आहेत.मूळचे आंदगाव मुळशीचे रहिवासी असणाऱ्या सुप्रिया शेखर शिंदे यांचे माहेर आंबेगाव तालुक्यातील असून त्यांना शिल्प कलेचा वारसा जन्मा पासून त्यांच्या वडिलांकडून लाभला असून आता पर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, स्वामी समर्थ,इत्यादी अनेक तसेच शरद पवार, किसनराव बाणखिले असे अनेक राजकीय पुढारी यांचे पुतळे त्यांनी घडविले. आणी आता आणखीन एक मानाचा तुरा त्यांच्या शिरपेचात डौलाने मिरवणार आहे आणि तो म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शिल्प कार्याची नोंद करून घेतली... सुप्रिया शिंदे यांनी साकारलेल्या स्वामीच्या मूर्तीची चर्चा संपूर्ण तळेगाव परिसरात जाणवली.....
0 Comments