प्राप्त माहितीनुसार, ९ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो. आठ दिवसा पूर्वी त्याच्या घरा जवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने घराजवळील झुळपात नेऊन त्याच्या वर अनैसर्गिक कृत्य केले होते. काल २८ एप्रिल रोजी त्या बालकाची आई पाणी भरीत असताना तिला घरा जवळील लहान मुलांचे कुजबुज ऐकले. तिने घरी येऊन आपल्या मुलास विचारले असता त्यांनी २२ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले. लगेच त्या मुलाचे आई वडील तसेच परिसरातील महिला पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविले.
पोलीसांनी कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम ३७७, ३६३, ५०६, पोस्को ४, ८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Comments