चंद्रपूर -महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढील काही दिवसात होणार आहे.  मागील पाच वर्षापासून राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. 

अशाच गोंधळाच्या वातावरणात विधानसभेच्या निवडणूकीच्या तयारीला राजकीय पक्ष, निवडणूक आयोग, प्रशासनासह, इच्छुक उमेदवारही लागले आहे.  या वेटींग आमदारांना जनतेच्या प्रश्नांचा अलिकडे प्रचंड कळवळाही यायला लागला आहे. प्रत्येकानी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपलीं कंबर कसली आहे .जनतेला आपल्या कळे आकर्षित करण्यासाठी उमेदवार कसोसीचे प्रयंत करतांना दिसत आहे.


चंद्रपूर लोकसभा निवडणूकीत  कॉंग्रेसला सर्वच मतदार संघात आघाडी मिळाल्यांने या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत.  बरेच  कॉंग्रेस नेत्यानी  उमेदवारी मागीतली आहे.  यातील काहीनी प्रचाराचा धडाकाही लावला आहे. ह्यात कुणाचे भाग्य उजळेल आणि कुणा कळे पक्षाचा ए. बी. फ्रॉम येईल ह्याची उसुकाता नागरिकांना सोबत  उमेदवार ना सुद्धा लागली आहे.