चंद्रपूर - सरते वर्षाला गुड बाय करून नवीन वर्षाच्या आगमन साठी बरेच लोक उत्साहित असतात. नवीन वर्षाच्या आगमनासाठी बाहेर जाऊन एन्जॉय करावे ही कल्पना असते .
ह्यात सावधगिरी न बाळगता आपले वाहन काही मंडळी वेगाने अथवा रोंग साईड ने चलवितात. ह्या सर्व गोष्टी बर आळा बसावा व सर्वांनी 31 डिसेंबर योग्य रित्या व सुखरूप मनवावा. ह्या साठी चंद्रपूर वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली असून ह्यात
ट्रिपल सिट, रॅश ड्रॉयव्हींग, स्टंटबाजी आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाÚयांवर होणार सक्त दंडात्मक कार्यवाही होणार आहे.ठिकठिकाणी चंद्रपूर पोलीस नाकाबंदी करून कार्यवाही चालू आहे.
सर्व जनतेने सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाऱ्या वर्षाचे योग्य रित्या स्वागत करावे हे पोलीस प्रशाशनाचे आह्वान आहे.

0 Comments