चंद्रपूर - स्वामी विवेकानंदजींच्या १६२ व्या जयंतीनिमित्त, सावनेर येथे नुकतीच एक भव्य विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्थानिक अमेया स्केटिंगअकादमी मधील ७ स्केटरनी या स्केटिंग स्पर्धेत भाग घेतला आणि खूप चांगले प्रदर्शन केले सर्व ७ स्केटरनी अमेया स्केटिंग अकादमीसाठी ७ पदके जिंकली ज्यात २ सुवर्ण ४ रौप्य आणि १ कांस्य पदके समाविष्ट आहेत.


सावनेरच्या तालुका क्रीडा संकुलात आयोजित या स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. आशिषजी देशमुख भाजप नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीवजी पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


या विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धेत नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, उमरेड, सावनेर, काटोल, कलमेश्वर, चंद्रपूर, चिमूर, हिंगणा, वरुड इत्यादी भागातील स्केटरनी भाग घेतला.


अमेयस्केटिंग अकादमीचे विजेते स्केटर आहेत.


सुवर्णपदक विजेते - समीर आतिश, धुर्वे.शौर्य गोडमारे


रौप्य पदक विजेता - रुद्र मनोज कुळमेथे, अंश फुलझाळे, वैदवी वांधारे, हितेश एम.पी.


कांस्यपदक विजेते - विधीत खोब्रागडे.


सर्व विजेते स्केटर्स त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे पालक आणि प्रशिक्षक आतिश धुर्वे यांना देतात