माजरी येथे एका कॅथोलिक ख्रिश्चन संस्था कडून संत कृषी विकास विद्यालय चालवली जात होती. या शाळेत संजय गायगोले 2010 पासून सहायक शिक्षक म्हणून काम करत होते. त्याच्या नियुक्ती पत्रात त्याचा पगार 9300 रुपये निश्चित करण्यात आला होता. पण शिक्षक गायगोले यांच्या बैंक खात्यात प्रति महिना 3 ते 5 हजार रुपये पगार जमा करून त्यांची फसवणूक करण्यात आली. या संदर्भात विचारणा केली असता संस्थेनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शिक्षकाच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. शिक्षक संजय गायगोले यांनी शिक्षण विभागाकडे पत्रपरिषद्वारे न्यायाची मागणी केली आहे.
संजय गायगोले यांनी माहिती दिली की, 2010 मध्ये त्यांची माजरी येथील संत कृषी विकास विद्यालय येथे सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्ती पत्रात त्यांचा पगार 9300 रुपये निश्चित करण्यात आला होता. 30 जुलै 2011 रोजी संस्थेने त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीसाठी अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार 2013 मध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली. या काळात त्यांचे खाते माजरी येथील सीडीसीसी बँकेत उघडण्यात आले. खात्यात 9300 ऐवजी कधी 3 हजार तर कधी 5 हजार रुपये पगार म्हणून खात्यात जमा करण्यात आला. या शाळेत एकूण 11 लोक काम करत होते. या सर्व शिक्षकांचे पगार अशाच पद्धतीने करण्यात आले.
या संदर्भात संस्थेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्यावर गायगोले यांना शेवटी थकबाकीची रक्कम परत करण्याचे सांगीतली. परंतु 2024 नंतर ही शाळा बंद करण्यात आली. त्यानंतर, थकबाकीच्या रकमेबद्दल विचारणा केली असता, शाळा व्यवस्थापन टाळाटाळ करणारी उत्तरे देत आहे. अधिवक्ता राकेश वाळके यांच्या द्वारे गायगोले यांनी संस्थेला पगाराची मागणी करणारी नोटीस पाठवली आहे परंतु अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. यामुळे शिक्षक गायगोले आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक आणि शारीरिक त्रास आणि उपासमारीचा सामना करावा लागत आहे. शिक्षक गायगोले यांनी संस्था व्यवस्थापनाला पत्राद्वारे 8 लाख 40 हजार 50 रूपए ची थकबाकी 12 टक्के व्याजासकट परत करण्याची विनंती पत्रपरीषदेत केली आहे.
----------------------------------------

0 Comments